ZP Ratnagiri Shikshak Bharti 2023
जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांची जागा भरून काढण्यासाठी मानधनावर ६८४ तात्पुरते शिक्षक नियुक्त केले आहेत. अजून १६ शिक्षकांची नियुक्ती केली जाणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. या नियुक्त्यांसाठीही एका शाळेत ३ ते ४ अर्ज आले होते.
महाराष्ट्रातील सरकारी व खाजगी नोकर भरतीच्या अपडेट्स साठी आजच Whatsapp Group जॉईन करा.👇🏽👇🏽
https://chat.whatsapp.com/BqqxrU3buR1LoCGpu4uKMY
ZP Ratnagiri Bharti 2023
As Per New ZP Teacher GR, there is a provision that Zilla Parishad teachers whose teacher vacancies are more than 10 percent cannot be relieved.., In Ratnagiri Zilla Parishad, taking into account the percentage of vacant posts of teachers according to medium, it was possible to release some teachers. As the percentage of vacant posts is more than 10 percent, it is expected that very soon Ratnagiri ZP Teacher Bharti will start. ZP Ratnagiri Bharti 2023
महिन्याला ९ हजार रुपये मानधन देण्याचे आदेश
या प्रश्नावरून ठाकरे शिवसेनेकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली. खासदार, आमदारांसह माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकार्यांकडून जिल्हा परिषद अधिकार्यांकडे निवेदने देण्यास सुरवात केली. शिक्षकांची तातडीने नियुक्त करा, अन्यथा मुलांना जिल्हा परिषदेत आणून बसवू, असा इशारा दिला होता. त्यानंतर शिक्षण विभागाकडून मानधनावर डीएड्, बीएड्धारकांना तात्पुरत्या स्वरूपात नियुक्तीचा प्रस्ताव तयार केला. त्याला पालकमंत्री उदय सामंत यांनी पाठबळ देत महिन्याला ९ हजार रुपये मानधन देण्याच्या सूचना केल्या. त्याला निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही मंत्री सामंत यांनी सांगितले. त्यामुळे मानधनावर शिक्षक नियुक्तीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीवर सोपवण्यात आली होती. उमेदवार निवडीत गावातील तरुणांना प्राधान्य देण्यात आले आहे. जिल्ह्यात सुमारे ७०० शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार असून, आतापर्यंत ६८४ जणांना मानधनावर काम करण्यास परवानगी दिली गेली आहे. दापोलीत ४ आणि गुहागरमध्ये १२ जणांची निवडप्रक्रिया सुरू आहे. प्रत्येक शाळेत ३ ते ४ इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यामधील एकाची निवड शाळा व्यवस्थापन समितीने केली आहे. ही नियुक्ती नवीन भरतीप्रक्रिया राबवेपर्यंत किंवा हे शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत राहणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
२७/०२/२०२१७ च्या शासन निर्णयानुसार घेतला. तसेच शासन निर्णय दिनांक ०७/०४/२०२१ नुसार सुधारीत निर्णय जाहार झालेला आहे. सन २०१७ नंतर जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन पध्दतीने आंतरजिल्हा बदल्या सुरु झाल्या. तथापि ज्या जिल्हा परिषदांची शिक्षक रिक्त पदे १० टक्के पेक्षा अधिक आहेत अशा जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना कार्यमुक्त करता येणार नाही अशी तरतूद आहे. त्यामुळे सन २०१७ पासून रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये शिक्षकांची माध्यमनिहाय रिक्त पदांची टक्केवारी विचारात घेऊन काही शिक्षकांना कार्यमुक्त करता येणे शक्य झाले. रिक्त पदांची टक्केवारी १० टक्के पेक्षा जास्त असल्यामुळे खालील कांष्टकानुसार माध्यमनिहाय शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने कार्यमुक्त केलेले नाही. आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त केल्यावर रत्नागिरी जिल्ह्यात एकूण १०९१ पदे रिक्त असून हि भरती लवकरच होणे अपेक्षित आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात एकूण १०९१ पदे शासन निर्णयानुसार | ZP Teachers Bharti 2023 | ZP Ratnagiri Bharti 2023
- It Ends With Us- Summary and Review
- Yellow Dress Rock Paper Scissors: Watch! Viral TikTok Trend
- Grus Brothers Net Worth: Uncovering the Secrets of Their Financial Empire
- Cayan Credit Card Processing: A Comprehensive Guide for US Businesses
- Majhi Ladki Bahin Yojana- Online Apply, पात्रता, संपूर्ण माहिती!