सामना एडिटोरियल टुडे: यवतमाळमधील उमरखेड पोलीस ठाण्यात राज्यसभा खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 11 डिसेंबर रोजी ‘सामना’मध्ये पंतप्रधान मोदींविरोधात एक लेख लिहिला होता. भाजपचे यवतमाळचे संयोजक नितीन भुतडा यांच्या तक्रारीवरून कलम १५३ (अ), ५०५ (२) आणि १२४ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीएम मोदींबद्दल आक्षेपार्ह लेख असल्याचा दावा तक्रारकर्त्याने केला आहे.