दक्षिण मुंबई दगडफेक: दक्षिण मुंबईतील भिंडी बाजार परिसरात दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीच्या प्रकरणी ५० हून अधिक लोकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने शनिवारी ही माहिती दिली. अधिकाऱ्याने सांगितले की, शुक्रवारी संध्याकाळी मिरवणुकीदरम्यान मौलाना आझाद रोडवरील गोल देवल मंदिर चौकाजवळ ही घटना घडली. अधिका-याने सांगितले की काही लोकांनी ट्रकवर मोठे स्पीकर लावले आणि मोठ्या आवाजात संगीत वाजवू लागले आणि घोषणाबाजी करू लागले, तर एका व्यक्तीने दगडफेकही केली. अधिकारी म्हणाले, “यामुळे दोन गटांमध्ये हाणामारी झाली, त्यानंतर घटनास्थळी सामान्य स्थिती पूर्ववत करण्यासाठी मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी तैनात करावे लागले.” जेजे पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, भारतीय दंड संहिता आणि महाराष्ट्र पोलिस कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.