
रवी आणि नवनीत राणा
हनुमान चालिसा प्रकरणी राणा दाम्पत्याची याचिका सत्र न्यायालयाने फेटाळली आहे. राणा दाम्पत्याने एप्रिल २०२२ मध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरातील मातोश्रीबाहेर हनुमान चालिसाचे पठण करण्याचा आग्रह धरला होता. यानंतर न्यायालयाने राणा दाम्पत्यातील अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांना मुंबई सत्र न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले. मात्र नवनीत राणा आणि रवी राणा न्यायालयात हजर झाले नाहीत.
नवनीत राणा आणि रवी राणा यांनी हे प्रकरण रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती. ती याचिका न्यायालयाने फेटाळली. यानंतर राणा दाम्पत्याने स्वत:ची निर्दोष मुक्तता करण्यासाठी न्यायालयात ही याचिका दाखल केली होती. या याचिकेवरही आज न्यायालयाने निकाल देत तीही फेटाळून लावली. याप्रकरणी पुढील सुनावणी ५ जानेवारीला होणार आहे. ही बातमी राणा दाम्पत्यासाठी मोठा धक्का मानली जात आहे.
हेही वाचा- आधी व्हॉट्सअॅप मग सिग्नल, असा म्हैसूरमध्ये रचला संसदेत घुसखोरीचा डाव!