केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी मंगळवारी बहुप्रतिक्षित भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम किंवा NCAP लाँच करणार आहेत. मोटार वाहनांची सुरक्षा मानके 3.5 टन पर्यंत वाढवून रस्ता सुरक्षा सुधारणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. “मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या मोटार वाहनांच्या क्रॅश सुरक्षेचे तुलनात्मक मूल्यांकन करण्यासाठी कार ग्राहकांना एक साधन प्रदान करणे हा कार्यक्रमाचा उद्देश आहे. या कार्यक्रमांतर्गत, कार उत्पादक स्वेच्छेने ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टँडर्ड (AIS) 197 नुसार चाचणी केलेल्या त्यांच्या कार देऊ शकतात,” मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.