राष्ट्रवादीचे नेते मनीष दुबे. (फाइल फोटो)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हिंदी भाषिक विभागाचे अध्यक्ष मनीष दुबे यांना मुंबईतील बोरिवली पोलिसांनी खंडणी प्रकरणी अटक केली आहे. मनीष दुबे यांनी आज (गुरुवारी) सकाळी बोरिवलीत अदानी इलेक्ट्रिसिटीच्या विरोधात निदर्शने केली होती. आंदोलनानंतर लगेचच पोलिसांनी त्याला अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मनीष दुबे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तो वॉन्टेड होता. मनीष दुबे याला पोलीस शुक्रवारी न्यायालयात हजर करणार आहेत.
बातमी अपडेट होत आहे…