देशाची आर्थिक राजधानी मुंबईला लागून असलेल्या ठाण्यातील भिवंडी शहरात आज भीषण आग लागली. शहरातील राहनाळ भागातील भारत पेट्रोल पंपाच्या मागे असलेल्या शिव कंपाऊंडमधील केमिकल गोदामाला ही आग लागली. आग इतकी भीषण होती की आकाशात अनेक किलोमीटर अंतरावरून धुराचे लोट दिसत होते. मात्र, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवली. आगीचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. पहा.