रुग्णालयातील मुलांच्या वॉर्डात दाखल असलेल्या मुलांना खूश करण्यासाठी भिंतींवर विविध प्राण्यांची रंगरंगोटी आणि चित्रे लावण्यात आली होती.अभिनव उपक्रमांतर्गत डॉक्टरांच्या टेबलवर मुलांची खेळणी, भिंतींवर प्राण्यांची चित्रे, इंग्रजी आणि हिंदी अक्षरे ठेवण्यात आली होती. रूग्णालयात दाखल झालेली मुले त्यांच्या शिक्षणाच्या जवळ राहावीत म्हणून भिंतींवर रंगरंगोटीने अक्षरे लिहिली आहेत.