ZP Jalgaon Bharti 2023
ZP Jalgaon Bharti 2023: Jalgaon Zilla Parishads under the Rural Development Department has decided to fill 612 vacant posts in ZP Jalgaon. For this MoU with IBPS company has finalized the action related to advertisement. Very soon ZP Jalgaon Bharti will be start. So keep Visiting this Page to get latest Update on Zilla Parishad Jalgaon Bharti 2023
ZP Jalgaon Bharti Information in Marathi
ZP Jalgaon Bharti- महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना सरकारी नोकरी मिळविण्याची संधी. राज्यातील विविध जिल्हा परिषदेतील रिक्त पदांवर लवकर भरती होणार असून जळगाव जिल्हा परिषद मध्ये 619 जागासाठी भरती प्रक्रिया होणार आहे. वर्ग तीनच्या विविध जागांसाठी ही भरती राबवली जाणार आहे. सरळसेवेतून ऑनलाइन परीक्षा होऊन आयबीपीएस कंपनीला परीक्षेचे कार्य देण्यात आले आहे. राज्यभरातील भरतीचे नियंत्रण पुणे जिल्हा परिषद अंतर्गत केले जाणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात 75 हजार पदे भरण्याचा निर्धार शासनाने केला आहे. ग्रामविकास विभागातंर्गत राज्यभरात 18 हजार पदे सर्व जिल्हा परिषद अंतर्गत विविध संवर्गातून भरण्यात येणार आहेत. त्यानुसार जळगाव जिल्हा परिषदेत गट क मध्ये 16 संवर्गातील अंदाजीत 612 पदे सरळ सेवेने भरण्यात येणार आहेत. अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे. या भरतीचा सविस्तर अभ्यासक्रम डाउनलोड करा तसेच सराव पेपर साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा.
- It Ends With Us- Summary and Review
- Yellow Dress Rock Paper Scissors: Watch! Viral TikTok Trend
- Grus Brothers Net Worth: Uncovering the Secrets of Their Financial Empire
- Cayan Credit Card Processing: A Comprehensive Guide for US Businesses
- Majhi Ladki Bahin Yojana- Online Apply, पात्रता, संपूर्ण माहिती!
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स मिळण्यासाठी महारोजगार अधिकृत Whatsapp लिंक क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये माहिती मिळवा.कोणती पदे रिक्त आहेत?आरोग्य सेवक महिला २९१, आरोग्य सेवक पुरुष ७४, कंत्राटी ग्रामसेवक ५८, कनिष्ठ सहायक (लिपिक) २८, पशुधन पर्यवेक्षक २६, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ५०, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक ४२, औषध निर्माण अधिकारी १०, पर्यवेक्षिका ९, पेसा क्षेत्रातील ११ विविध पदे भरली जाणार आहे. भरतीसाठी पदे मंजूर झाली असली तरी या विषयीची अधिसूचना अद्यापही प्राप्त नाही. यासह वेळापत्रकही अद्याप जाहीर केलेले नाही. राज्यभरात एकाच वेळी ही भरती प्रक्रिया होणार असल्याचं समजतेय.
भरतीसाठी आवश्यक पात्रता काय?जिल्हा परिषदेतील कनिष्ठ साहाय्यकपदासाठी आता किमान पदवी आवश्यक असणार आहे. या आधी बारावी उत्तीर्णची भरती होत होती. त्यात बदल करण्यात आला असून, नियुक्तीसाठी पदवी ही शैक्षणिक अर्हता आवश्यक करण्यात आल्याची राजपत्रात अधिसूचना जारी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या सूत्रांनी दिली. यासह या पदासाठी किमान ३० शब्द प्रतिमिनिट मराठी टंकलेखन किंवा ४० प्रति मिनिट इंग्रजी टंकलेखनाचे संगणक प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक असल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे. कनिष्ठ साहाय्यक पदावरील नियुक्तीसाठी पदोन्नतीने ४० टक्के, अनुकंपा तत्वावरील ५० टक्के व वाहनचालक यांना कायमस्वरूपी बदलीने १० टक्के प्रमाण लागू राहणार आहे.
जिल्हा परिषदेत आगामी भरतीत कनिष्ठ सहाय्यकाची २८ पदे सरळ सेवा भरतीने भरण्यात येणार आहे.यासंदर्भात आयबीपीएस या कंपनीशी सामंजस्य करार होऊन जाहिरातीशी संबंधित कार्यवाही अंतिम टप्प्यात असून लवकरच जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यासोबतच एकूण रिक्त पदांच्या 10% पदे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून तर 20 टक्के पदे अनुकंपाची या भरती प्रक्रिया दरम्यानच भरण्यात येणार आहेत. असेही डॉ. आशिया यांनी कळविले आहे.रिक्त पदे 15 ऑगस्ट, 2023 पूर्वी भरण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषदे अंतर्गत आरोग्य व इतर विभागातील संवर्गाच्या पद भरतीचा कालबद्ध कार्यक्रम विभागाच्या अनुक्रमे 21 ऑक्टोबर, 2022 व 15 नोव्हेंबर, 2022 च्या शासन निर्णयान्वये जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार जळगाव जिल्हा परिषदेच्या रिक्त पदांची बिंदू नामावली अंतिम करण्याचे काम पूर्ण झालेले आहे.
सदर पद भरतीची परीक्षा आयबीपीएस या कंपनीद्वारे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. त्यादृष्टीने जळगाव जिल्हा परिषदेची तयारी अंतिम टप्प्यात असून लवकरच जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अर्ज दाखल केल्यापासून परीक्षेपर्यंत उमेदवारांना येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेने हेल्पलाइन नंबर जाहीर केला आहे. 0257/2224255 या हेल्पलाइन क्रमांकावर जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. असे आवाहन डॉ. आशिया यांनी केले आहे.