अहमदनगर शहराचे नामकरण : ‘अहिल्यानगर’ हे आता अहमदनगर शहराचे नवीन नाव आहे, मंत्रिमंडळाने आज हे प्रस्ताव मंजूर केले आहे। अहिल्यानगर नावाची घोषणा 18 व्या शतकातील मराठा राणी अहिल्याबाई होळकर यांच्या नावावर केली गेली आहे।
राज्य सरकारने आता अहमदनगर शहराला नवीन नाव दिले आहे. अहमदनगर शहराला आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर म्हणून मान्यता मिळाली आहे. आज सह्याद्री अतिथिगृहावर आयोजित कॅबिनेट बैठकीत याबद्दलचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अहमदनगर शहराला आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असे नवीन नाव दिले जाईल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमडळाची बैठक नुकतीच संपली आहे. या बैठकीत उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेते मंडळी उपस्थित होते. यावेळी झालेल्या बैठकीत अहमदनगर शहराला पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर म्हणून ओळखले जाणार आहे. मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला आज मंजुरी दिली आहे. 18 व्या शतकातील मराठा राणी अहिल्याबाई होळकर यांच्या नावावरून अहमदनगर शहराला पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर म्हणून ओळखले जाणार आहे.
राजगड नामकरण: वेल्हे या गावाचे नाव राजगड करण्यात आले आहे, गडांचा गड राजगड अस ओळखल्या जाणाऱ्या राजगड चे नाव वेल्हे या गावाला देण्यात आले आहे। आता वेल्हे हे गाव राजगड या नवीन नावाने ओळखले जाणार।